कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हि अत्यंत महत्वाची बातमी आहे आज जगभरात आपल्या सर्वाना कोरोना व्हायरस चा दुष्प्रभाव पहायला मिळत आहे त्या अनुषंगाने शासनाने आपल्या सर्वांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आपल्याला कोणताही त्रास होता कामा नये यासाठी शासनाने मोठ मोठे पाउल उचललेले आहेत. आणि अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा शासनाने शेतकरी बांधवाना शेतकरी कर्जमाफी करून यांना लाख मोलाचा दिलासा दिलेला आहेच.

पण जी कर्जमाफी केली आहे त्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे यासाठी तुम्ही माझा हा लेख सुद्धा वाचू शकता महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना [2020] महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

या वाढत्या कोरोना व्हायरस चा दुष्प्रभाव पाहता शासनाने कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा करण्याकरिता आधार प्रमाणीकरण करण्याचे काम तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहे. आणि याची सूचना त्यांनी अधिकृत आपले सरकार सेवा केंद्र यांच्या लॉगीन मध्ये देण्यात आली आहे. ती सूचना खालील प्रमाणे आहे.

Message! कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश आल्यानंतर eKYC प्रक्रिया चालू करण्यात येईल.

असा मेसेज/सूचना महाराष्ट्र सरकारने आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोह्चिण्याचा प्रयत्न केला आहे. या सूचनेचा अर्थ असा आहे कि ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले आहे आणि त्यांना ekyc म्हणजे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम हे पुढील आदेश येईपर्यंत शासनाने तात्पुरता बंद ठेवण्यात आले आहे. या नुसार तुम्ही सुद्धा हा मेसेज किंवा हि सूचना आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रांबरोबर नक्की पोहचवा.

या सुचने चा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाने केलेल्या कर्जमाफी मध्ये तुम्हाला जे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोटाचे ठसे देण्याची गरज भासते. यामुळे अश्या सार्वजनिक ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे ते त्या ठिकाणी येऊन बोटाचे ठसे देतील पण कोणाच्या चुकीमुळे किंवा सामाजिक अंतर (Social Distancing) चे पालन नाही करू शकले तर या चुकी चा त्रास आपल्या शेतकरी बांधवांना सहन करावा लागेल एवढेच नव्हे तर या पासून त्यांच्या परिवाराला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो

माझी सुद्धा आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कि आपण शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आपण आपले सर्वांचे कोरोना व्हायरस पासून बचाव करावा आणि योग्य ती सुरक्षा काळजी घ्यावी.

कर्जमाफी यादी विषयी मी खूप सविस्तरपणे तुमच्या समोर माझ्या लेखामध्ये लिहिलेले आहे ते तुम्ही नक्की वाचा कर्जमाफी यादी [2020] महाराष्ट्र कशी पहावी, कोठे पहावी आणि काय करावे यामध्ये तुम्हाला कर्जमाफी यादी कशी पहावी काय करावे हि संपूर्ण माहिती दिली आहे आणि अशी माहिती मी वेळोवेळी तुमच्या पर्यंत पोहचवत राहील त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचे काम नाही वेळोवेळी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहावी

या सोबतच तुम्हाला तुमच्या गावामध्ये जवळपास csc center म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र कुठे आहे हे माहिती नसेल तर यासाठी सुद्धा मी तुम्हाला योग्य ती प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र कुठे आहे हे बघू शकता व त्या केंद्रचालाकाचे नाव सुद्धा बघू शकता.

आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) आपल्या गावामध्ये कुठे आहे हे कसे बघायचे?

आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center) आपल्या गावामध्ये कुठे आहे हे कसे बघायचे?

  1. दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या  https://locator.csccloud.in/
  2. तुमचे राज्य निवडा.
  3. तुमचा जिल्हा निवडा
  4. तुमचा तालुका निवडा
  5. दिलेला प्रतिमेतला कॅप्त्चा (Captcha) भरावा.
  6. Search या बटण वर क्लिक करा.
  7. तुमच्या समोर तुमच्या गावामध्ये असलेली सर्व (CSC Center) आपले सरकार सेवा केंद्र चालकांची नावे व त्यांचा पत्ता दिसेल.

हा पत्ता तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवा म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आधार प्रमाणीकरण करण्याचे आदेश जाहीर करेल त्यावेळेस तुम्हाला बाहेर दुसरीकडे फिरण्याची आवश्यकता नाही या साठी तुम्ही थेट तुमच्या गावातील जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपले कर्जमाफी मिळण्याकरिता आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

माझी सर्व शेतकरी बांधवाना विनंती कृपया घरी रहा सुरक्षित रहा (Stay Home Stay Safe)

तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद!