महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना [2020] महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2020 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना म्हणजे शेतकरी बांधवांसाठी हि लाख मोठा दिलासा देणारी एकमेव योजना आहे हि योजना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांची गटबंधनसरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लागू करण्यात आली आहे. हि कर्ज माफी योजना फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे. यामध्ये शेतकर्यांचा विचार करून त्यांचासाठी अगदी सहज आणि सोपी पद्धत या सरकार ने आणली आहे यावेळेस शेतकऱ्याला कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणताही अर्ज किंवा फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पिक कर्ज हे २ लाखांपर्यंत थकबाकी असेल आणि तसेच पुनर्गठीत पिक कर्ज ते सुद्धा या योजनेमध्ये माफ केले जाईल आणि त्यासोबतच शेतकरी मित्राला कोणतीही थकबाकी भरण्याची अट नाही.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेमध्ये शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार आणि शेतकरी कर्जमाफी यादी केव्हा पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याने कसा घ्यायचा आहे याबद्दल खालील लेखात आम्ही खूप सविस्तर पद्धतीने तुमच्या समोर मांडले आहे तर कृपया तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेऊन आपल्या आणखी शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली आहे हि योजना नेमकी काय आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल चला या योजनेबद्दल आपण जाणून घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही जमीन धारणा क्षेत्र विचारात न घेता ती पात्रता धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेमध्ये 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पिक कर्ज व अल्पमुदत पिक कर्जाच्या पुनर्गठीत किंवा फेर पुनर्गठीत कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम मुद्दल व व्याज मिळून रुपये दोन लाख पर्यंत असलेल्या सर्व कर्ज खात्यात रुपये दोन लाख पर्यंत शासनातर्फे कर्जमुक्ती देणार आहे.

आधार नंबर कर्जखात्यासोबत लिंक करून घ्यावे
आधार नंबर कर्जखात्यासोबत लिंक करून घ्यावे

त्यासाठी तुम्हाला पहिल्या टप्प्यात आपण आपला आधार क्रमांक अजूनपर्यंत बँकेत दिला नसेल तर तो त्वरित बँकेत द्यावा आणि आपले कर्ज खाते आधार क्रमांक सोबत जोडून घ्यावे. जे कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडले गेलेले नसेल अशा कर्जखात्याची यादी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांमध्ये आणि गावातील ग्रामपंचायत वर प्रसिद्ध केली जाईल. पुढच्या टप्प्यात तुम्ही तुमचा आधार आधार क्रमांक दिला असल्यामुळे आधार सोबत लिंक असलेल्या कर्जखात्याची माहिती संबंधित बँका किंवा विकास संस्था यांच्यामार्फत कर्जमुक्ती पोर्टलवर दर्शविल्या जाईल. या आधारावर गावनिहाय शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची यादी प्रत्येक बँक शाखा गाव ग्रामपंचायत आणि आपले सरकार सेवा केंद्रावर CSC सेवा केंद्र या ठिकाणी प्रसिद्ध केले जाईल. यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नावा समोर असलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात (CSC Center) जावे. आधार किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारावर तुमच्या कर्ज खात्यात दर्शविलेली थकित रक्कम मान्य असल्यास त्यास तुमची संमती द्यावी लागणार आणि आधार प्रमाणीकरण करावे लागणार. असं करताच नियमानुसार कर्जमुक्त ची रक्कम पोर्टल द्वारे निश्चित केली जाईल आणि ती थेट तुमच्या कर्ज खात्यात जमा होईल. जर तुमच्या कर्ज खात्यामध्ये दर्शवलेली रक्कम किंवा आधार क्रमांक आपणास मान्य नसेल तर पोर्टलवर आपली तक्रार आपोआप दाखल होईल मात्र त्यासाठी तुमचा आधार क्रमांक देऊन प्रमाणीकरण करून घ्यावे आता तुमची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे गेली याबाबत समिती अंतिम निर्णय घेईल त्यानुसार कर्जमुक्ती ची रक्कम नियमानुसार निश्चित होईल. बँकांकडे आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्जखात्याची यादी मार्च महिन्यात प्रसिद्ध होईल त्यानंतर राहिलेल्या कर्जखात्यांच्या याद्या एप्रिल आणि मे महिन्यात वेळोवेळी प्रसिद्ध होतील. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्ज खाते असल्यास तुमचे नाव ज्या ज्या वेळी यादीत येईल त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC Center) जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. बँकांकडून सर्व कर्जखात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ची लाभ रकमेसह कर्जखात्याची कर्जमाफी अंतिम यादी तुमच्या गावातील ग्रामपंचायत वर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यासोबतच तुम्हाला कर्जमुक्ती प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल अशा प्रकारे तुम्हाला ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजना शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या कर्जातून कर्जमुक्त करणार आहे.

अंतिम कर्जमाफी यादी
अंतिम कर्जमाफी यादी

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2020 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही

  • जे आधी माजी मंत्री किंवा आमदार किंवा खासदार होऊन गेले असतील आणि त्यासोबतच सध्या त्यांचा पदावर विराजमान असतील त्यांना या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अशे व्यक्ती जे सध्या सरकारी नोकरी करत असतील मग ती केंद्र असो किंवा राज्य शासनाची असो अशे अधिकारी किंवा कर्मचारी ज्यांचा मासिक पगार हा पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त वर्ग ४ चे कर्मचारी यामधून वगळले आहेत.
  • ज्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत किंवा कृषीउत्पन्न बाजार समिती तसेच  सहकारी दूध संघ किंवा नागरी सहकारी बँका तसेच सहकारी सूत गिरण्या यांचे जे काही संचालक मंडळ असेल आणि या संस्थांमध्ये ज्यांना महिन्याला २५ हजार पेक्षा जास्त पगार असेल अशे अधिकारी यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अशे व्यक्ती जे सेवानिवृत्त होऊन ज्यांचे पेन्शन पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • तसे शेती व्यतिरिक्त ज्यांचे उत्पन्न असेल आणि ते आयकर भरत असतील अश्या व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा – कर्जमाफी यादी [2020] महाराष्ट्र कशी पहावी, कोठे पहावी आणि काय करावे