karjmafi yadi 2020 maharashtra
Table of Contents
कर्जमाफी यादी 2020 महाराष्ट्र कशी पहावी, कोठे पहावी आणि काय करावे
कर्जमाफी यादी 2020 ( karjmafi yadi 2020 maharashtra pdf) सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी तुमची प्रतीक्षा संपली, हो वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला कर्जमाफी ची बातमी ऐकून नक्कीच आनंद झाला असेलच कारण सर्व शेतकरी मित्र याची प्रतीक्षा करत होते आणि आज हि प्रतीक्षा संपली कारण कर्जमाफी हि एक शेतकऱ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे.
आता तुम्हाला हि यादी पाहण्याची इच्छा झाली असेल मागील काही दिवसअगोदर महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी शेतकरी यांची कर्जमाफी ची घोषणा केली होती परंतु अद्याप हि ती कर्जमाफी शेतकरी बांधवांना मिळू शकली नव्हती परंतु गेल्या दोन दिवस अगोदर कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांची यादी 2020 कर्जमाफी यादी हि प्रकाशित करण्यात आली.
कर्जमाफी हि कोणत्या जिल्ह्यात झाली
राष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्या मध्ये कर्जमाफी झाली ती यादी खालीलप्रमाणे
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, पालघर.
कर्जमाफी यादी 2020 कशी बघावी
शेतकरी कर्जमाफी यादी 2020 (karjmafi yadi 2020 maharashtra pdf download) MJPSKY बघायच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या खालील प्रमाणे
- ज्या बँक मधून तुम्ही कर्ज घेतले असेल त्या बँकेत जाऊन तुम्ही तिथे कर्जमाफी यादी बघू शकता
- जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) इथे जाऊन तुम्ही तुमचे नाव आणि गाव सांगून कर्जमाफी यादी बघू शकता
- तुम्ही स्वत: कर्जमाफी यादी हि ऑनलाइन बघू शकता.
खाली मी तुम्हाला तिन्ही पद्धतिने यादी कशी बघावी या विषयी सविस्तर सांगणार आहे.
1. बँक मध्ये कर्जमाफी यादी कशी बघावी
- ज्या बैंक मध्ये तुमचे खाते असेल तिथे तुम्ही तुमचे सोबत आधार कार्ड आणि बैंक पासबुक सोबत घेउन जाने गरजेचे आहे
- बैंक मध्ये गेल्यावर तुम्हाला बँकेच्या बाहेरच तुमची पात्र झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी पहायला मिळेल, बैंक ही कर्जमाफी यादी वेळोवेळी प्रकाशित करेल.
- यादी मध्ये आपले नाव बघून घ्यावे व त्यासमोर असलेला विशिष्ट क्रमांक लिहून घ्यावा.
- तुमच्या नावा समोर असलेले एकूण माफ झालेले कर्जाची एकूण रक्कम दिसेल ती बघून नीट पडताळून घ्या
- तुमच्या नावा समोर असलेली एकूण थकबाकी रक्कम हि बरोबर असेल तर तुम्ही आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बँकेच्या कर्मचारी जवळ जाऊन आपण नोंद केलाला विशिष्ट क्रमांक त्या बँक कर्मचारीस सांगावा.
- बँक कर्मचारी तुमचे आधार प्रमाणीकरण करून घेईल आणि तुमची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल.आधार प्रमाणीकरण
- आता तुम्हाला फक्त अंतिम यादी बघायची वाट पहायची आहे कारण हि अंतिम कर्जमाफी यादी नसून फक्त तुमची एकूण थकबाकी किती आहे आणि हे खर आहे फक्त याचे प्रमाणीकरण आपल्याला करून देणे आहे जेणे करून महाराष्ट्र सरकार आपली तेवढी थकबाकी असलेले कर्जमाफ करेल.
- जर तुम्हाला तुमच्या नावासमोर असलेल्या थकबाकी मध्ये काही तफावत किंवा काही चूक आढळली असेल तर तसे सुद्धा तुम्हाला बँक कर्मचाऱ्यास सांगावे लागेल आणि आधार प्रामाणिकरण करून तुमची तक्रार दाखल करावी लागेल, कारण तुमच्या थकबाकी मध्ये असलेली त्रुटी ते दूर करून देतील आणि परत यादी प्रकाशित करतील, त्यानुसार तुमचे कर्जमाफी यादी मध्ये जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा तेव्हा तुम्ही आधार प्रमाणीकरण करून देणे गरजेचे आहे, जेणे करून तुम्हाला कर्जमाफी मिळण्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये आणि तुम्ही कर्जमाफीचा लाभ घ्यावा.
2. आपले सरकार सेवा केंद्र (CSC) इथे कर्जमाफी यादी कशी पहावी आणि काय करावे
- वरील प्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र (CSC) इथे जातांना सुद्धा तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक किंवा खाते क्रमांक सोबत घेऊन जाणे.
- आपले सरकार सेवा केंद्र (CSC) इथे गेल्यावर इथे तुम्हाला शक्यता यादी काही ठराविक केंद्रावरच पाहायला मिळू शकेल कारण शासन हि यादी वेळोवेळी प्रकाशित करत असल्या मुळे आणि हि नावे पूर्ण आपल्या गावातील असल्यामुळे एवढे प्रिंट काढून ठेवणे हे प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांना परवडण्यासारखे नाही त्यामुळे अश्या ठिकाणी तुम्हाला जिथे काही वेळ रांगेत सुद्धा उभे राहावे लागू शकते.
- आपले सरकार सेवा केंद्रावर गेल्या नंतर तुम्ही त्यांना तुमचे पूर्ण नाव आणि तुमचे कर्ज खाते ज्या बँक मध्ये आहे त्या बँकेचे नाव सांगावे, या नुसार आपले सरकार सेवा केंद्र चालक (CSC VLE) तुमचे कर्जमाफी यादी मध्ये नाव तपासून पाहतील. आणि तुम्हाला सांगतील. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या नावासमोर असलेला एक विशिष्ट क्रमांक सुद्धा देतील.
- तुमच्या नावा समोर असलेला तो विशिष्ट क्रमांक आपल्या जवळ सांभाळून ठेवावा.
- तुमच्या नावा समोर असलेली एकूण थकबाकी रक्कम हि बरोबर आहे कि नाही हि तपासून घ्यावी हि बरोबर असेल तर तुम्ही आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना सांगावे त्या नुसार ते तुमचे फिंगर प्रिंट बोटाचे ठसे घेऊन तुमचे आधार प्रमाणीकरण करून घेतील.
- अश्या प्रकारे तुमची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल.
- आता तुम्हाला फक्त अंतिम यादी बघायची वाट पहायची आहे कारण हि अंतिम कर्जमाफी यादी नसून फक्त तुमची एकूण थकबाकी किती आहे आणि हे खर आहे फक्त याचे प्रमाणीकरण आपल्याला करून देणे आहे जेणे करून महाराष्ट्र सरकार आपली तेवढी थकबाकी असलेले कर्जमाफ करेल.
- वरील प्रमाणे जर तुम्हाला तुमच्या नावासमोर असलेल्या थकबाकी मध्ये काही तफावत किंवा काही चूक आढळली असेल तर तसे तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालक (CSC VLE) यांना सांगावे त्यानुसार ते आधार प्रामाणिकरण करून तुमची तक्रार दाखल करून घेतील, कारण तुमच्या थकबाकी मध्ये असलेली त्रुटी ते दूर करून देतील आणि परत यादी प्रकाशित करतील, त्यानुसार तुमचे कर्जमाफी यादी मध्ये जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा तेव्हा तुम्ही आधार प्रमाणीकरण करून देणे गरजेचे आहे, जेणे करून तुम्हाला कर्जमाफी मिळण्यामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये आणि तुम्ही कर्जमाफीचा लाभ घ्यावा.
- वरील प्रक्रिया हि पूर्णपणे विनामुल्य आहे तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र चालक (CSC VLE) यांना कोणतेही पैसे देण्याची गरज नाही, त्यांना पैसे देण्याचे काम सुद्धा हि महाराष्ट्र सरकार करणार आहे त्यामुळे तुम्ही हि पूर्ण प्रक्रिया विनामुल्य करू शकता.
3. स्वत: कर्जमाफी यादी हि ऑनलाइन कशी बघावी
- कर्जमाफी यादी 2020 महाराष्ट्र हि तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाइन बघू शकता, त्याकरिता तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
- शासनाने दोन अधिकृत वेबसाईट बनविल्या आहे एका वेबसाईटवर तुम्हाला कर्जमाफी ची पूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि दुसऱ्या वेबसाईट वर तुम्हाला फक्त कर्जमाफी यादी 2020 महाराष्ट्र पाहायला मिळेल.
- शासनाची अधिकृत वेबसाईट https://mjpsky.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर तुम्हाला कर्जमाफी ची पूर्ण माहिती पाहायला मिळेल
- शासनाची अधिकृत वेबसाईट https://mjpskyportal.maharashtra.gov.in/portal/login या वेबसाईट वर तुम्हाला कर्जमाफी यादी पाहायला मिळेल
- https://mjpskyportal.maharashtra.gov.in/portal/login दिलेल्या वेबसाइट ला भेट द्यावी किंवा ही वेबसाइट ओपन करावी mjpsky.maharashtra.gov.in
- कर्जमाफी फॉर्म भरतांना तुम्हाला तुमचा युजरनेम वापरकर्ता नाव आणि पासवर्ड मिळाला असेल तो तुम्हाला इथे भरावा लागेल
- आकृती मध्ये दिसत असलेला captcha भरावा लागेल आणि login बटन वर क्लिक करावा लागेल.
- login केल्यानंतर तुम्ही तुमची कर्जमाफी यादी बघू शकाल आणि आपल्या नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक नोंद करून ठेवा व तसेच आपल्या नावासमोर असलेली थकबाकी हि बरोबर आहे किंवा नाही हि तपासून घ्यावी.
- तुम्ही तपासलेली तुमची एकूण थकबाकी बरोबर असेल किंवा नाही तरी तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (Common Service Center) इथे जाऊन आधार प्रामाणिकरण करून घ्यावे लागेल जेणे करून तुम्हाला कर्जमाफी चा लाभ मिळेल.
अश्या प्रकारे तुम्ही तुमची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने (MJPSKY) अंतर्गत झालेली कर्जमाफी यादी 2020 बघू शकता आणि कर्जमाफी चा लाभ घेऊ शकता. धन्यवाद
आज 28 फेब्रुवारी 2020 रोजी जवळ जवळ शेतकरी कर्जमाफी ची दुसरी यादी सुद्धा प्रकाशित झाली आहे, सर्वत्र एकच खळबळ उडाली होती की चला आज कर्जमाफी ची यादी बघूया तर आम्ही सांगितल्या प्रमाने सर्व शेतकरी बांधव त्यांची कर्जमाफी यादी महाराष्ट्र (karjmafi yadi 2020 maharashtra pdf download) आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्रांवर जाऊन तिथे कर्जमाफी यादी बघितली.
पण सकाळी सकाळी शासनाच्या वेबसाईट वर काही तांत्रिक अडचणी मुळे बहुतेक शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी खूप वेळ रांगेत उभे राहावे लागले आणि थोडा त्रास सहन करावा लागला पण दिवसाअखेर वेबसाईट पूर्णपणे व्यवस्थित पणे काम करत होती आणि कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण सुरळीत पार पडत होते.
तरीही माझी सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की काळजी करण्याचे कारण नाही कारण आज पहिलाच दिवस असल्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी बांधवांना शेतकरी कर्जमाफी यादी बघायचीउत्सुकता झाली होती त्यामुळे एकदमच सर्व्हर डाउन झाले होते पण परत तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा पुर्वरत करून शेतकरी बांधवांना धीर देण्यात आला.
याठिकाणी तुम्हाला शेतकरी कर्जमाफी यादी 2020 (karjmafi yadi 2020 maharashtra pdf download) विषयी वेळोवेळी माहिती मिळत राहील, आम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी तत्पर आहोत आणि जसे आम्हाला शासनाकडून सूचना प्राप्त होतील त्याही आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवू त्यामुळे या लेखाला नियमित भेट देत रहा
कर्जाची रक्कम खात्यामध्ये केव्हा जमा होइल
तुमची एकूण थकबाकी रक्कम तुम्ही तपासून घेतल्या नंतर आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे आपले आधार प्रमाणीकरण करून घेतल्या नंतर आपल्या कर्जखात्यात तेवढी रक्कम 2 ते 3 दिवसात जमा करण्यात येईल अश्या प्रकारे कर्जमाफी ची रक्कम तुम्हाला मिळेल
कर्जमाफी ची पहिली यादी केव्हा प्रकाशित झाली?
कर्जमाफी ची पहिली यादी 24-02-2020 ला प्रकाशित झाली?
कर्जमाफी ची दूसरी यादी केव्हा प्रकाशित झाली?
कर्जमाफी ची दूसरी यादी 28-02-2020 ला प्रकाशित झाली?
कर्जमाफी ची तीसरी यादी केव्हा प्रकाशित होईल?
कर्जमाफी ची तीसरी यादी ही मार्च महिन्यात प्रकाशित होईल?
कर्जमाफी ची अंतिम यादी केव्हा प्रकाशित होईल?
कर्जमाफी ची अंतिम यादी एप्रिल आणि में महिन्यातकेव्हा प्रकाशित होईल?
कर्जमाफी ची रक्कम खात्यामध्ये केव्हा जमा होईल?
आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण केल्यानंतर 24 तासामध्ये तुमची थकीत मान्य असलेली कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल
कर्जमाफी मिळण्यासाठी काय करावे लागेल?
कर्जमाफी मिळविण्यासाठी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन तुमचे कर्जमाफी यादी 2020 मध्ये नाव आहे किंवा नाही तपासल्यानंतर कर्जखात्यासोबत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल
कर्जमाफी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र CSC यांना पैसे द्यावे लागतील का?
नाही, आधार प्रमाणीकरण राज्य सरकार ने हे पूर्णतः विनामुल्य ठेवण्यात आले आहे, त्यामुळे आधार प्रामाणिकरण करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही, आणि असे कोणी आढळल्यास तुम्ही त्यांची तक्रार जवळच्या ग्रामपंचायत किंवा तहसील मध्ये सुद्धा करू शकता
कर्जमाफी यादी 2020 मध्ये नाव बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील का?
नाही, कर्जमाफी यादी हि तुम्ही पूर्णतः मोफत बघू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राला CSC भेट द्यावी लागेल
हे सुद्धा वाचा :- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना [2020] महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना(MJPSKY)
कर्जमाफी यादी बद्दल खूप छान महिती दिली आहे
karjmafi yadi 2020 csc center la lavli nahi aahe
Hi
karjmafi yadi 2020 3rd kevha yeil
At post pipra tha umred dist nagpur
mi vivid seva sahkari sanstha madhun karj ghetale.mala insurance cha pan labh milala.pan santha mala insurance chi rakkam withdral det nahi. mi kay karu upay suchva.
धन्यवाद!
तुम्ही त्यांना नाव सांगून तुमची यादी बघू शकता कर्जमाफी यादी 2020 हि खूप मोठी असल्या कारणामुळे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक ती यादी आपल्या केंद्रावर लावू शकले नाहीत, त्यामुळे चिंतेचे कारण नाही
मार्च महिन्यात येईल
सर खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी, परंतु धुळे जिल्ह्याची लिस्ट डॉनलोड होत नाही आहे 4 दिवस होऊन सुद्धा जर आपल्या पैकी कुणा शेतकऱ्याकडे लिस्ट असल्यास कृपया आपण sandipborse7n@gmail.com ह्या आयडी वर मेल करून सहकार्य करावे..
Nashik jilha list send kara mail id war
Satara Jilha chi list mail I’d send kara pls
amrutbabar30@gmail.com
शंकर संभाजी शिंगवाड मरवाळीकर ता नायगाव जि नांदेड
Online account open kasa karava, username kuthe milnar?